अफार्म- पुणे व युवा ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
धाराशिव जिल्ह्यात ११ गावामध्ये शेतकरी शेतीशाळा घेण्यात आल्या. शेतीशाळेस गावातील
पाणी वापर समिती, कृषी विकास समिती व तरुण शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. या ११
गावामध्ये L&T फायनान्स सर्व्हिसेस, अफार्म पुणे
व युवा ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जल
संधारनेची कामे करण्यात आली होती. गावातील पाझर तलावाचे गाळ उपसा करणे
, नदी खोलीकरण, बांध बंधीस्ती ,
शेतक-यांना गांडूळ खत बेड, रेन पाईप ,
ड्रम इ . देऊन ते सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण
देण्यात आले होते. याच कामाची उजळणी करण्यासाठी अफार्म आणि युवा ग्राम विकास मंडळ यांच्या
वतीने शेतीशाळा घेण्यात आल्या यामध्ये कळंब तालुक्यातील मोहा,मस्सा, बोर्डा,मंगरूळ, शेळका धानोरा इ
गावाचा समवेश आहे तर धाराशिव तालुक्यातील चिखली, दारफळ,
कामेगाव, महाळंगी, बोरखेडा
आणि आणि बेंबळी या गावाचा समावेश आहे. युवा ग्राम संस्थेचे प्रकल्प समन्वयक
संतोष रेपे व सर्व गावातील कृषीदूत, गावातील सरपंच,
ग्रामसेवक , कृषी विकास समिती सदस्य, पाणी वापर गट सदस्य उपस्थित होते.
प्रशिक्षणाद्वारे कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घ्यावे?, सेंद्रिय
पद्धतीने शेती कशी करावी?, गोगल गाय नियंत्रण कसे करावे?
शासनाच्या शेंद्रिय शेती संबधित योजना काय आहेत?, व गावात आणखी काही जलसंधारनेची कामे करण्यास वाव आहे
का ? असेल तर पंचायत समिती किंवा जलसंधारण डिपार्टमेंट
अंतर्गत आपणास काय उपाययोजना करता येतील? यावर चर्चा झाली .
या शेतीशाळेच्या यशस्वितेसाठी नितीन सावंत, संजय मडके,
रवी जाधव, पंडित पंडित जाधव, गणेश काळे,बिभीषण गायकवाड, दत्तात्रय
मुंडे, साई प्रसाद ढवळे, हनुमंत
कदम,अनिल काळे, महावीर पाटील, संजीव आगळे, विकास चव्हाण,संभाजी
वळशे यांनी अतोनात परिश्रम घेतले .
तसेच तरुण वर्गाला शेतीशी निगडीत व्यवसाय करण्यास प्रेरित
केले . सेंद्रिय शेतीकडे वळणे आजची गरज बनली आहे . वेळोवेळी अशा शेती शाळा
झाल्याने शेतकरी नक्कीच शाश्वत शेंद्रीय शेतीकडे वळतील व कमी
पाण्यात शेती पिकविण्यासाठी पुढे सरसावतील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी अल्प
खर्चिक शेती तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात जास्त उत्पादन घावे असे प्रतिपादन युवा
ग्राम विकास मंडळ संस्थेचे कार्यकारी सचिव एच पी देशमुख यांनी केले. या शेतीशाळेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा धाराशिव
मा.श्री नागेश उगलमुगले व सेंद्रिय शेती करणारे शेतकरी मा.श्री. हनुमंत कदम हे
मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते प्रत्येक गावातील ३० ते ३५ शेतकरी या शाळेसाठी
उपास्थित होते. यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.
=> मा.नागेश उगलमुगले (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा धाराशिव)

.jpg)

Nice work
ReplyDelete