शेतकरी मेळावा
कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या आर्थिक सहाय्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अफार्म नंदुरबार जिल्ह्यात "एकात्मिक ग्रामिण विकास प्रकल्प" राबवित आहे. या प्रकल्प अंतर्गत पाणलोट व्यवस्थापन आणि उपजीविका विकास उपक्रमांचा समावेश केलेला आहे.
एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प, नंदूरबार अंतर्गत गाव वडझाकण येथे "शेतकरी मेळावा" घेण्यात आला.
या शेतकरी मेळाव्यात गावकऱ्यांना अल्पखर्चिक आणि सुधारित शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यांमध्ये -
1) अल्पखर्चिक शेती पद्धती
2) अन्नद्रव्यांचे कमतरतेची बाह्य लक्षणे व उपाय
3) मातीचे आरोग्य सुधारणा उपाययोजना
4) जैविक कीड नियंत्रण
5) भैतिक कीड नियंत्रण
6) हवामानामुकुल उपाययोजना
7) पौष्टिक तृणधान्यातील पौष्टिकता
8) प्रमुख पिकांच्या अल्पखर्चिक पिक उत्पादन पद्धती
9) रासायनिक औषधीचे हानिकारक परिणाम व योग्य व्यवस्थापन
10) शेतीसाठी आधुनिक यांत्रिकीकरनाचा वापर
11) शासकीय योजना
यावेळी शेतकरी याच्या शंका-अडचणींचे निरसन करण्यात आले, त्या दरम्यान उपस्थित शेतकरी यांना पर्यावरण संवर्धनसाठी स्थानिक प्रजातीचे १००० वृक्ष वितरण मा.वन विभागाचे अधिकारी यांचा हस्ते देण्यात आले.
प्रात्यक्षिक- जिवामृत तयार करण्यात आले व महत्व सांगण्यात आले.
उपस्थित - कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सह्यायक, PFO वन विभाग अधिकारी, साधनव्यक्ती,सरपंच व अफार्म कर्मचारी




